रावेरात कुटुंब अर्थसहाय्य योजनेंंतर्गत 35 निराधार महिलांना धनादेशाचे वाटप


रावेर : रावेर तालुक्यातील कुटुंब अर्थसहाय्य योजनेंंतर्गत 35 निराधार महिलांना आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी प्रांतधिकारी कैलास कडलग, तहसीलदार उषाराणी देवगुणे उपस्थित होत्या. रावेर तालुक्यातील 35 निराधार महिलांना आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते प्रत्येकी 20 हजारांप्रमाणे धनादेशाचे वाटप करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, डॉ.सुरेश पाटील, संतोष पाटील, महेश लोखंडे, सरपंच योगेश पाटील, निवासी नायब तहसीलदार सी. जी.पवार उपस्थित होते. प्रभारी नायब तहसीलदार जी.एन.शेळकर, लिपिक योगेश मोहिते, एच.डी.कोकणी, पुरूषोत्तम महाजन आदीनी निराधार ंहिलाची प्रकरणे मंजूर करण्यासाठी परीश्रम घेतले.

कोविड संदर्भात आमदारांची बैठक
आमदार शिरीष चौधरी यांनी धनादेश वाटप केल्यानंतर रावेर ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली व पाहणी केली तसेच उपाय योजनेसंदर्भात माहिती दिली. ब्रेक द चैन संदर्भात आमदार चौधरी यांनी नागरीकांनीदेखील शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !