सावद्यात कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन सेवा


पत्रकार स्व. कैलाससिंग परदेशी व ललिना अरोरा यांच्या स्मरणार्थ उपक्रम

सावदा : कोरोना महामारीत मयत झालेले दै.सामनाचे पत्रकार स्व. कैलाससिंग गणपतसिंग परदेशी व स्व.लीना राजकुमार आरोरा यांच्या स्मरणार्थ ओरीजनल पत्रकार संघ, सावदा व संलग्न मराठी पत्रकार संघ, मुंबई यांच्यातर्फे सावदा येथे कोरोना काळात गरजू कोविड रुग्णांसाठी अत्यावश्यक सेवा म्हणून ऑक्सीजन सेवा सुरू करण्यात आली. त्याचे औपचारीक उद्घाटन मंगळवार, 18 रोजी करण्यात आले. ऑक्सिजन सिलेंडर सावदा नगरपरीषदेच्या स्वाधीन करून रुग्णांसाठी पालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेत लावण्यात आले व गरजू रुग्णांना ऑक्सिजन सेवा दिली जात आहे.

यांची होती उपस्थिती
ऑक्सिजन सेवा ही ओरीरजनल पत्रकार संघ सलग्न महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्याकडून गेल्या पंधरा दिवसापासून सुरू करण्यात आली. गरज पडल्यास नेहमीसाठी रुग्णवाहिकेत पत्रकार संघाकडून ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध केले जाणार आहे. गरजुंनी ओरीजनल पत्रकार संघ, सावदा यांच्याशी संपर्क साधण्याचे देखील यावेळी आवाहन करण्यात आले. या छोटेखानी कार्यक्रमास सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी, ओरीजनल पत्रकार संघाचे अध्यक्ष युसूफ शाहा, उपाध्यक्ष व जिल्हा संघटक कैलास लवंगडे, सचिव दीपक श्रावगे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष व सल्लागार भानुदास भारंबे, प्रसिद्धीप्रमुख प्रदीप कुलकर्णी, सकलकडे, सदस्य फरीद शेख, संतोष परदेशी, सावदा तलाठी शरद पाटील, हॉटेल पंजाबचे मालक राजूभाई पंजाबी, पत्रकार स्व.कैलाससिंग यांचे सुपुत्र उद्धवसिंग कैलाससिंग परदेशी, रुग्णवाहिका चालक विकी भिडे, गोटू पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमावेळी कोरोना काळात संवेदनशीलपणे आपले कर्तव्य बजावणारे सावदा नगरपरीषदेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना ओरीजनल पत्रकार संघाच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !