अवैध वाळू वाहतूक : एकास अटक ; दुसरा पसार
रावेर : अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारी ट्रॅक्टर-ट्रॉली पोलिस प्रशासनाने जप्त गुन्हा दाखल करीत करीत एकास अटक केली तर दुसरा पसार झाला.रसलपूरकडून रावेर शहरात येणार्या कच्च्या रस्त्याने लेंडीपुर भागात ट्रॅक्टर (क्र.एम.एच. 19 बी.जी.4473) येत असताना त्याची त्याची तपासणी केली असता त्यात एक विना असलेली वाळू आढळली. रावेर पोलिस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला व दोन लाख तीन हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी स्वप्निल महाजन (24, रा.अटवाडे) याला अटक करण्यात आली तर कैलास महाजन (अटवाडे) पसार झाला. अधिक तपास नाईक महेंद्र सुरवाडे करीत आहेत.




