रावेरात मुख्याधिकार्‍यांसह न्यायाधीशांची बैठक


व्यापक रक्तदान शिबिरासह ऑक्सीजन सिलिंडर उपलब्धीसाठी चर्चा

रावेर : जनहितासाठी रक्तदान शिबिर आयोजनासह लोकवर्गणीतून ऑक्सीजन सिलिंडर उपलब्ध करण्यासंदर्भात प्रशासनातील विविध अधिकार्‍यांसह न्या.आर.एल.राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत न्यायालय आवारात मंगळवारी बैठक झाली. यावेळी आठ ते दहा ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करण्यासाठी निधी जमा करण्यावर चर्चा झाली.

यांची होती उपस्थिती
रावेर न्यायालयाच्या परीसरात झालेल्या बैठकीस न्या.आर.एल.राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीसह तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी.महाजन, मुख्याधिकारी रवींद्र लांडे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, वकील संघातर्फे अ‍ॅड.योगेश गजरे, अ‍ॅड.जे.जी.पाटील, अ‍ॅड.डी.ई.पाटील, अ‍ॅड.महाजन उपस्थित होते.



या विषयावर झाली चर्चा
या बैठकीत सरकारी सर्व नोकरवर्ग, वकील संघ, पोलिस प्रशासन पंचायत समिती सर्व कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी आदी मिळून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे ठरले तसेच लोकवर्गणी करून ऑक्सिजन सिलेंडर जास्तीत-जास्त कसे उपलब्ध करून देता येईल यावर चर्चा करण्यात आली व संसर्गजन्य आजार वाढू नये यासाठी प्रत्येक नागरीकांनी मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सचे पालन करावे व विनाकारण घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !