कोरोना : 11 रुग्णांचा मृत्यू तर 521 रुग्ण आढळले


एकाच दिवसात 665 रुग्णांची कोरोनावर मात : 24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात गत 24 तासात नव्याने 521 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात तब्बल 11 रुग्णांचा मूत्यू झाला. गत 24 तासात 665 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत 2438 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे तर 24 तासात 665 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 36 हजार 285 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 24 हजार 346 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.



मंगळवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 51
जळगाव ग्रामीण 13
भुसावळ 51
अमळनेर 04
चोपडा 54
पाचोरा 03
भडगाव 02
धरणगाव 14
यावल 37
एरंडोल 19
जामनेर 70
रावेर 50
पारोळा 15
चाळीसगाव 70
मुक्ताईनगर 44
बोदवड 15
अन्य जिल्हा 09



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !