कुंभारखेड्यांत मृत्यूचे तांडव : 21 दिवसांत 24 जणांचा मृत्यू


सावदा : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यातच रावेर तालुक्यातील कुंभारखेडा गावाच्या मृत्यू दरात वाढ झाली आहे. गेल्या 21 दिवसात 24 जणांचा विविध कारणाने मृत्यू झाला आहे. ग्रामस्थांच्या मृत्यूमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने मृताच्या कुटुंबातील सदस्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !