भालोदच्या प्राध्यापकाचा म्यूकरमायकोसीसने बळी


भुसावळ : भालोद, ता.यावल येथील कला व विज्ञान महाविद्यालयातील हिंदी विषयाचे प्रा.डॉ.प्रमोद मनोहर चौधरी (55) यांचे मंगळवारी पहाटे मुंबईतील जे. जे. हॉस्पीटलमध्ये म्युकरमायकोसिस आजाराने निधन झाले. तब्बल सव्वादोन महिन्यांपासून ते कोरोनासोबत झुंज देत होते. मंगळवारी ही झुंज अपयशी ठरली.

सव्वा दोन महिन्यांची झुंज अपयशी
भालोद येथील मूळ रहिवासी व सध्या शहरातील सोपान कॉलनी, शांतीनगर भागात वास्तव्यास असलेले प्रा.डॉ.प्रमोद मनोहर चौधरी हे भालोद महाविद्यालयात हिंदी विषयाचे प्राध्यापक होते. 9 मार्चला त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 13 मार्चला त्यांना जळगाव येथे मानस हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र कोरोनावर विजय मिळवल्यानंतर त्यांचा डोळा सुजल्याने म्युकरमाकोसीसचे लक्षणे समोर आली. यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. सायनसमध्ये फंगल इन्फेक्शनवर उपचारासाठी ऑपरेशन करण्यात आले. मात्र त्यावेळी डोळा देखील सुजला होता. डोळ्याची दृष्टीही गेली होती, मात्र डोळा न काढता राहू दिला होता. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असतानाच त्यांना पॅरेलेसीसचा झटकाही आला. यानंतर पून्हा डोळा सुजल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील जे. जे. हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले. तेथे कोरोनाची तपासणी केली असता पून्हा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पून्हा कोरोनाचे उपचार करण्यात आले. मुंबईत 6 मे रोजी पून्हा ऑपरेशन करुन डोळा काढला गेला. नंतर दोन दिवस ऑब्झरवेशन ठेवण्यात आले. याच दरम्यान मंगळवारी उपचारादम्यान निधन झाले तर भुसावळात रात्री त्यांच्या पार्थिवावर उपचार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार भाऊ असा मोठा परीवार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !