वरणगावात ऑक्सिजन पार्क बनविण्याचा संकल्प


माजी नगराध्यक्ष सुनील काळे : वरणगाव भाजपातर्फे वृक्षारोपण

वरणगाव : भाजपा नेते माजी मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त वरणगाव शहरात पर्यावरणाचा समतोल राखला जाण्यासाठी तसेच प्रत्येक नागरीकाला ऑक्सिजन मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले की, माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त व या दिवसापासून वरणगाव शहरात भाजपाने वृक्षारोपणाची सुरवात केली आहे. वरणगाव शहरातील नागरीकांना ऑक्सिजन मिळाला पाहिजे यासाठी संपूर्ण शहरात वृक्षारोपण करण्यात येईल शिवाय शहराला आता ऑक्सिजन पार्क असलेले शहर बनवण्यात येईल.

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, माजी सरपंच सुभाष धनगर, अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीस डॉ.सादीक शेख, अल्पसंख्यांक भाजपा उपाध्यक्ष हितेश चौधरी, युसूफ खान, गोलू राणे, भाजयुमो शहराध्यक्ष संदीप भोई, योगेश माळी, दीपक धनगर, सरचिटणीस आकाश निमकर, उपाध्यक्ष पप्पू ठाकरे, गजानन वंजारी, मिलिंद भैसे, कृष्णा माळी, संदीप ज्ञानेश्वर माळी, डॉ.प्रवीण चांदणे, महिला मोर्चा शहराध्यक्ष प्रणिता चौधरी-पाटील, शंकर पवार, लखन माळी, गोलू वंजारी, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष डी.के.खाटीक, उपाध्यक्ष असपाक खाटीक, भाजयुमो शहर चिटणीस संतोष कश्यप, रॉक्स जयेश कपाटे, जनार्धन साबळे, प्रसिद्धीप्रमुख राहुल जंजाळे, कमलाकर मराठे, सुभाष धनगर आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !