मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात पुर्नविचार याचिका दाखल करा
जगन सोनवणे : किनगावात पी.आर.पी.व संविधान आमीर्र्ची पत्रकार बैठक
यावल : मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात पुर्नविचार याचिका दाखल करावी त्यासोबतच मोदी सरकारने संसदेत कायदा पारीत करून केंद्र सरकारने राष्ट्रपती महामहिमांच्या स्वाक्षरीने मराठा समाजाला न्याय द्यावा तसेच मराठा धनगर, मुस्लिम समाजाला ही आरक्षण द्यावे तसेच तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेवर बंदी घालावी, अशी मागणी पी.आर.पी.चे महामंत्री जगन सोनवणे यांनी केली. यावल तालुक्यातील किनगाव येथे पी.आर.पी.व संविधान आर्मीसह 10 विविध संघटनांनतर्फे आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते.
त्या अभिनेत्रीविरुद्ध गुन्हा दाखल करणार
जगन सोनवणे म्हणाले की, तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील अभिनेत्री बबिताने मेहतर समाजाचा अपमान केला असून या अभिनेत्रीविरुद्ध अॅट्रॉसिटीा गुन्हा दाखल करणार आहोत. कोळी समाजाला जात प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यासह मुंबईला सुद्धा लॉकडाऊन उठल्यावर रेल रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे बहुजन नेते जगन सोनवणे म्हणाले.



यांची होती उपस्थिती
पत्रकार परीषदेला पी.आर.पी.चे उत्तर महाराष्ट्र प्रमुख राकेश बग्गन, यावल तालुकाप्रमुख राहुल साळुंके, पी.आर.पी.जिल्हा उपाध्यक्ष रतन वानखेडे, युवा तालुकाध्यक्ष नाना साळुंके, शिवसेनेचे पदाधिकारी व किनगाव खुर्द ग्रामपंचायतीचे सदस्य बबलू कोळी, राष्ट्रीय मजदूरसेना जिल्हा प्रमुख हरीष सुरवाडे, किनगाव खुर्दचे सरपंच भूषण नंदन पाटील व किनगाव बुद्रूकचे सरपंच पती संजय सयाजीराव पाटील, उपसरपंच अनिल रामराव पाटील, संविधान आर्मीचे रावेर तालुकाप्रमुख चंदू भागेस्वर, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मुकेश साळवे, अनिल भोई तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

