भरधाव आयशरची धडक ; दुचाकीस्वार गंभीर जखमी


यावल : यावल-भुसावळ रस्त्यावर बुधवारी रात्री साडेआठ वाजता दुचाकीस आयशर वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार मुकेश भास्कर सपकाळे (28, अंजाळे) जखमी झाला. यावल रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर गोदावरी हॉस्पिटलला हलवण्यात आले. अंजाळे येथील रहिवासी मुकेश भास्कर सपकाळे हा तरुण दुचाकीने रात्री आठ वाजता अंजाळे येथून चोपडा जाण्यासाठी निघाला असता भुसावळ नाक्याजवळ यावलकडून भुसावळकडे भरधाव वेगात आलेल्या आयशरने धडक दिल्याने तरुणाचा उजवा पाय मोडला गेला तर दुचाकी आयशरमध्ये अडकून सुमारे पाचशे मीटर अंतरापर्यंत ओढली गेली. रफिक पटेल व सुमित निकम यांनी त्यास उपचारार्थ हलवले. डॉ.शुभम तिडके, अधिपरीचारिका प्रियंका महाजन यांनी प्रथमोपचार केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !