उसनवारीच्या पैश्यांच्या वादातून एकास दोघांची मारहाण


यावल : उसनवारीचे पैसे घेण्याच्या वादातून दोघांनी एकास लोखंडी फायटरने मारहाण केली. बुधवारी शहरातील संभाजी पेठेत ही घटना घडली. या प्रकरणी यावल पोलिसात दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला. सौरभ डिगंबर बैरागी तरुणाच्या फिर्यादीनुसार त्याच्या मित्राचे पैसे अजय अशोक नारेकर (रा. बुरूज चौक) याने घेतल्याने बुधवारी सौरभने अजय बोरेकरकडे त्या पैशांची मागणी केल्याने अजय नारेकर व त्याचा भाऊ दीपक अशोक नारेकर यांनी सौरभला शिविगाळ केली तर अजयने त्याच्याजवळील लोखंडी फायटरने सौरभच्या डोक्यावर आणि मानेवार वार केले. सौरभ बैरागी यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्धव् गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार नितीन चव्हाण करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !