तापी नदीपात्रात बुडाल्याने 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू


यावल : तालुक्यातील अंजाळे येथील तापी नदीच्या पात्रात बुडून 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, 20 रोजी दुपारी 12.30 वाजता घडली. अरुण उर्फ बालू शालिक कोळी (रा.शेळगाव, ता.जळगाव) असे मयताचे आहे. शेळगाव येथील अरुण ऊर्फ बालू शालिक कोळी हा तरुण गुरुवारी अंजाळेजवळील तापी नदीच्या पात्रात आंघोळ करण्यासाठी आला असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो खोल पाण्यात बुडून मयत झाला. यावल पोलिस व अंजाळे येथील नागरीकांनी पुढाकार घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढाला. लक्ष्मण भास्कर सपकाळे यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास हवालदार अशोक जवरे करीत आहे. डॉ.अक्षय लाडगे मृतदेहाचे शवविच्छेदन केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !