राष्ट्रीय स्पर्धेतील प्रथम विजेत्या सोहेल कच्छीचा राष्ट्रवादीतर्फे सत्कार
भुसावळ : भुसावळातील श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील सोहेल कच्छी या विद्यार्थ्याने विद्यावर्धिनीच्या राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेच्या ट्रेक 3 मध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याने वरणगावातील राष्ट्रवादी पदाधिकार्यांनी त्याचा सत्कार केला.
राष्ट्रीय स्पर्धेत पटकावला क्रमांक
भुसावळच्या श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक-विज्ञान विभागातील तृतीय वर्षाचा विद्यार्थी व वरणगावातील रहिवासी सोहेल हमीद कच्छी याने शेतीसाठी उपयोगी असलेला रोबोट विकसीत करीत राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. या यशाबद्दल त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरणगाव शहराच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भाऊ चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भुसावळ तालुकाध्यक्ष दीपक मराठे, अल्पसंख्याक भुसावळ तालुकाध्यक्ष पप्पू भाई जकातदार, माजी नगरसेवक रवींद्र सोनवणे, शकील दादा, हमीद मेमन, उपशहराध्यक्ष कैलास माळी, शेख रीजवान, डॉ.ऐहसान अहमद, विनायक शिवरामे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



