भुसावळात उद्या या केंद्रांवर मिळणार कोविशील्ड लस
भुसावळ : भुसावळ शहरात 45 वर्षावरील नागरीकांसाठी कोविशील्डचा पहिला डोस उपलब्ध झाल्याने शनिवारी यावल रस्त्यावर नगरपालिकेच्या मुख्य दवाखान्यात 300 नागरीकांना तर खडका रोड दवाखान्यात 200 नागरीकांना डोस दिला जाणार आहे. शहरातील वरणगाव रोड, बद्री प्लॉट दवाखाना व महात्मा फुले नगर या सर्व ठिकाणी लसीकरण बंद राहणार आहे. दरम्यान, पालिका दवाखान्यासह खडका रोडवरील दखाखान्यात सकाळी नऊ ते पाच दरम्यान लसीकरण होईल मात्र लसीचा साठा संपल्यानंतर लसीकरण केंद्र बंद होणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार लसीचा दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर 12 आठवडे (84) दिवसांनी घ्यावयाचा आहे.




