रावेर प्रभारी विस्तार अधिकार्यांचा सोमवारी निघणार पदभार
रावेर : रावेरचे प्रभारी विस्तार अधिकारी हबीब तडवी यांचा पदभार सोमवारी काढला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. यास जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे बाळासाहेब बोटे यांनी दुजोरा दिला आहे. पाच महिन्यांपूर्वी रावेरवरुन बदली झालेले हबीब तडवी यांना पुन्हा रावेर पंचायत समितीत प्रभारी विस्तार अधिकारी म्हणून तीन दिवसांचा चार्ज देण्यात आला होता. हा पदभार काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांनीही नाराजी व्यक्त करीत पदभार काढण्याचा सूचना केल्या होत्या. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी रावेरचा अतिरिक्त पदभार काढून घेण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे बाळासाहेब बोटे यांना दिल्याचे डॉ.बी.एन.पाटील यांनी ‘जनशक्ती’शी बोलतांना सांगितले.




