तेराव्या विवाहाच्या तयारीतील तरुणीसह नातेवाईक जाळ्यात
नवरीच्या आईसह भावाची मात्र पांझरा नदीतून चारचाकीसह घेऊन पोबारा
अमळनेर : तेराव्या विवाहाच्या तयारीत असणार्यासह तरुणीसह तिच्या नातेवाईकांना करून पोलिसांनी विवाहाच्या बहाण्याने लूट करणार्या रॅकेटचा पर्दाफाश केला. फसवणूक करणारी नवरी सोनू राजू शिंदे (सिद्धार्थ नगर, हिंगोली), नवरीचे मामा योगेश संजय साठे (रा.शिवसेनानगर, अकोला), नवरीची मावशी पूजा प्रताप साळवे (रा.सिद्धार्थनगर, हिंगोली) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विवाह करताच केला पोबारा
शहादा तालुक्यातील मंदाणे येथील भूषण संतोष सैंदाणे या युवकाचे हिंगोली येथील सिद्धार्थ नगरातील सोनू राजू शिंदे या युवतीशी 6 मे रोजी लग्न होताच 15 मे रोजी नवविवाहितेने सासरहून पोबारा केल्याने पती भूषणने शहादा पोलिस ठाण्यात पत्नी हरवल्याची 16 मे रोजी तक्रार दिली. बेपत्ता विवाहितेच्या तपासादरम्यान ही महिला पढावद (ता.शिंदखेडा) येथे प्रवीण शिवाजी पाटील या दुसर्या मुलाशी अमळनेर तालुक्यातील कपिलेश्वर मंदिरावर लग्न करीत असल्याची माहिती शहादा पोलिसांना कळाली मात्र लॉकडाऊनमुळे विवाह समारंभांना बंदी असल्याचे कळाल्यानंतर हा विवाह नरडाणा जवळच्या मुडावद येथे करण्याचे ठरवण्यात आले व पोल्लिसांनी तेथेजावून फसवणूक करणार्या नवरीसह तिच्या आप्तांना ताब्यात घेतले.



