महामार्गावर भरधाव बल्करचे चाक निखळले : तरुणाचा मृत्यू


भुसावळ : भुसावळकडून जळगावकडे जाणार्‍या भरधाव सिमेंट बल्करची मागील दोन चाके एक्समधून निखळल्यानंतर ही चाके महामार्गाजवळील चौधरी मोटर्सनजीक दुचाकीवर बसलेल्या तरुणाच्या अंगावर धडकल्याने त्याचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास साकेगावनजीक राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. या अपघातात बादल गोकुळ पवार (17, रा.साकेगाव) या तरुण युवकाचा मृत्यू झाला. भुसावळकडून जळगावकडे सिमेंटचा ट्रक (एम.एच.15 एफ.व्ही.9994) जात असताना अचानक मागील दोन्ही चाके एक्सलमधून निखळली व एक चाक एका धाब्याजवळील नालीत पडले तर दुसरे चाक विरुद्ध दिशेने महामार्गावरील चौधरी मोटर्सजवळ दुचाकीवर बसलेल्या बादल पवार या तरुण युवकाच्या अंगावर आदळल्याने तरुणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर बल्करवरील चालक व क्लिनर पसार झाले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !