कुर्‍हाकाकोडा कोविड सेंटरला पाच ऑक्सीजन कॉन्सस्ट्रेटर देणार : अ‍ॅड.रोहिणी खडसे यांची ग्वाही


मुक्ताईनगर : तालुक्यातील कुर्‍हाकाकोडा येथील लक्ष्मीनारायण चौधरी आश्रमशाळेत लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे खेवलकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांनी भेट दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ.तोडसाम आणि डॉ.बाठे यांनी कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या रुग्णांबाबत माहिती दिली व पदाधिकार्‍यांनी रुग्णांच्या तब्येत्तीची विचारपूस केली. कुर्‍हाकाकोडा कोविड सेंटरला पाच ऑक्सीजन कॉन्सस्ट्रेटर देणार असल्याची ग्वाही अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी प्रसंगी दिली.

कोरोना योद्ध्यांचा केला सत्कार
अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी कोविड केअर सेंटरमध्ये काम करणार्‍या कर्मचारी, रुग्ण यांना सॅनिटायझर व मास्क उपलब्ध करून दिले. यावेळी कुर्‍हा परीसरातील नागरीकांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे, रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या पाठपुराव्याने कुर्‍हा येथील कोविड सेंटरला मंजुरी मिळाल्याबद्दल आणि रोहिणी ताई खडसे खेवलकर यांनी 30 बेड उपलब्ध करून दिल्याने त्यांचे आभार मानले व अ‍ॅड.खेवलकर यांना निवेदन देऊन कुर्‍हा कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन कॉन्सस्ट्रेटर उपलब्ध करून देण्याची मागणी केली. अ‍ॅड.रोहिणी खडसे खेवलकर यांनी लवकरच पाच ऑक्सीजन कॉन्सस्ट्रेटर उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. यावेळी कोविड केअर सेंटर मध्ये रुग्णांना सेवा देणार्‍या डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय यांचा सत्कार करण्यात आला.



यांची होती उपस्थिती
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, सरचिटणीस रविंद्र दांडगे, विशाल महाराज खोले, काकोडा सरपंच तुळशीराम कांबळे, पोलिस पाटील विजय पाटील, अनंत पाटील, रमेशसेठ खंडेलवाल, पवन पाटील, रवींद्र पाटील, संतोष कांडेलकर, अनंत कांडेलकर, वाल्मिक भोलाणनकर, कचरू बढे, मुन्ना बोडे, शंकर मोरे, सुशील भुते, मितेश राठोड, रुपेश माहुरकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !