31 हजारांची केबल कंडारीतून लंपास
भुसावळ : तालुक्यातील कंडारी येथील तापी नदीच्या पात्रातील पंपाची केबल चोरट्यांनी लांबवल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 31 हजार 500 रुपये किमतीची तांब्याची केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याप्रकरणी कंडारी येथील सरपंच सुवर्णा कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. हवालदार महेंद्र ठाकरे पुढील तपास करत आहेत.




