चोरट्यांना आता भावू लागल्या सायकल


जळगाव : जिल्ह्यात दुचाकी लांबवण्याच्या घटना एकीकडे घडत असताना शहरात मात्र चोरट्यांना आता सायकलही भावू लागल्याचे चित्र आहे. खान्देश मिल कॉलनी, गणेश कॉलनीत संजीव राजमल मंत्री (43) हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. 8 मार्च ते 3 मार्च 2021 दरम्यान त्यांच्या घराच्या समोर पार्किंगला लावलेली सायकल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्यानंतर परीसरात शोधाशोध घेवूनही सायकल न मिळाल्यानंतर दोन महिन्यानंतर सोमवारी 24 मे रोजी दुपारी संजीव मंत्री यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रविण भोसले करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !