चांदणी रेल्वे स्थानकाच्या मुख्य इमारतीचा भाग कोसळला


सुदैवाने प्रवासी नसल्याने टळली जीवीतहानी 3 सिग्नल अ‍ॅड टेलिकॉम यंत्रणा ठप्प

भुसावळ : मध्य प्रदेशातील बर्‍हाणपूर-नेपानगर या दोन्ही स्थानकाच्या मध्ये असलेल्या चांदणी या लहान रेल्वे स्थानकावर असलेली दोन मजली इमारतीचा काही भाग बुधवारी दुपारी 3.55 वाजता कोसळला मात्र सुदैवाने जीवीतहानी टळली तर सुमारे 40 हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ईमारतीचा भाग कोसळल्याने सिग्नल अ‍ॅड टेलिकॉम यंत्रणा ठप्प पडली आहे. रेल्वे स्थानकावरील ही मुख्य इमारतीतत स्टेशन मास्तर यांचे कार्यालय, तिकीट खिडकी, सिग्नल अ‍ॅड टेलिकॉम विभागाचे कार्यालय आदी कार्यालये आहे. एडीआरएम मनोजकुमार सिन्हा, वरिष्ठ अभियंता (समन्वय) राजेश चिखले यांनी चांदणी रेल्वे स्थानकावर जाऊन भेट देत पाहणी केली. ही इमारत 2004 मध्ये बांधण्यात आल्याचे सांगण्यात आले.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !