भुसावळ नाशिक विभागात एकमेव ‘अ’ वर्ग पालिका ; दरवर्षी कोट्यवटींचा अर्थसंकल्प मात्र गटारींवरील ढाप्यांचीदेखील नाही दुरुस्ती


भुसावळातील नगराध्यक्षांचा वास्तव्य असलेल्या म्युन्सीपल पार्क भागातील प्रकाराने नागरीक त्रस्त

भुसावळ : नाशिक विभागात एकमेव ‘अ’ वर्ग पालिका असलेल्या भुसावळ पालिकेचा दरवर्षी कोट्यवधींचा अर्थसंकल्प सादर होतो, विकासकामांसाठी लाखोंची तरतूद केली जाते मात्र लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे वास्तव्यास असलेल्या म्युन्सीपल पार्क भागातील साध्या गटारींवरील ढाप्यांची दुरुस्ती होत नसल्याने या भागातील नागरीकांमध्ये आश्‍चर्य व तितकाच संताप आहे.

निवडणुका तोंडावर ; आतातरी नगराध्यक्ष साहेब लक्ष देणार का ?
म्युन्सीपल पार्क भागात गत वर्षभरापासून गटारींवरील ढापा तुटल्याने वाहन धारकांसह पादचार्‍यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार पालिकेत तक्रारी करून सुद्धा पालिका प्रशासनाचा निष्क्रियतेमुळे आजपर्यंत ढापा नव्याने होऊ शकला नाही शिवाय याच कॉलनीत नगराध्यक्ष रमण भोळे वास्तव्यास असल्याने नागरीकांच्या त्यांच्याकडून नागरीकांना फार मोठ्या नाहीत किमान किरकोळ समस्या सुटण्याची अपेक्षा आहेत. काही महिन्यांवर पालिकेच्या निवडणुका आल्या आहेत त्यामुळे आतातरी नगराध्यक्ष या समस्या सोडवण्यावर भर देणार का? असा प्रश्‍न या भागातील नागरीक उपस्थित करीत आहेत. मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनीदेखील वेळ काढून या भागातील समस्या सोडवण्यासंदर्भात गांभीर्याने दखल घेण्याची नागरीकांना माफक अपेक्षा आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !