दोघे दुचाकी चोरटे वरणगाव पोलिसांच्या जाळ्यात


वरणगाव : वरणगाव पोलिसांनी दोन दुचाकी चोरट्यांच्या बसस्थानक परीसरातून बुधवार, 26 रोजी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून लांबवलेल्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत. संतोष रघुनाथ चौधरी (30) व विष्णू सुरवाडे (हतनूर धरण, ता.भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. वरणगाव पोलिस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार ईस्माइल शेख, हवालदार मजहर पठाण, कॉन्स्टेबल पराग दुसाणे, कॉन्स्टेबल योगेश जोशी यांनी आरोपींना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून गॅम्लर, बॉक्सर, स्पेंडर, ड्रिम युगा कंपनीच्या चोरी केलेल्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !