बोदवडमध्ये सहा महिन्यात एकच दुकान दुसर्‍यांदा फोडले


बोदवड : सहा महिन्यात दुसर्‍यांदा एकच दुकान चोरट्यांनी फोडत दुकान मालकाचा ताप वाढवला. शहरातील जामनेर रस्त्यावर व बोदवड पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूस शहरातील जामनेर रस्त्यावर पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूस न.ह.रांका हायस्कूलसमोर अनिल गुलबाचंद अग्रवाल यांचे आडत दुकान आहे. 26 रोजी सकाळी दुकान बंद केल्यानंतर 27 रोजी सकाळी दुकान उघडले असता दुकानाच्या शटरचे कुलूप तुटलेले आढळले व शटर उघडे दिसल्याने अग्रवाल यांनी दुकानात पाहणी केली असता दुकानातील तूरडाळचे साठ किलो वजनाचे एकूण 32 कट्टे चोरीला गेला. त्याची किंमत एक लाख 14 हजार आहे. गत नोव्हेंबर महिन्यात ही या दुकानाच्या छताचे पत्रे वाकवून चोरट्यांनी 50 क्विंटल कापूस लांबवला होता. सहा महिन्यात अडीच लाखांचे व्यापार्‍याचे नुकसान झाले. बोदवड पोलिसात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !