मुक्ताईनगर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी सुनीता चौधरी बिनविरोध
मुक्ताईनगर : पंचायत समितीच्या उपसभापतीपदी सुनीता किशोर चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीवेळी पंचायत समिती सभापती सुवर्णा साळुंखे, पंचायत समिती सदस्य विकास पाटील, राजेंद्र सवळे, शुभांगी भोलाणे यांच्यासह जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, जि.प.चे माजी गटनेते विनोद तराळ, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, विधानसभा क्षेत्रप्रमुख विजय सोनार, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, पं.स.चे माजी सभापती राजु माळी, संदीप देशमुख, सरचिटणीस कल्याण पाटील, रवींद्र दांडगे, अतुल पाटील, सुनील काटे, लिलाधर पाटील, रऊफ खान, चंद्रकांत भोलाणे, प्रदीप साळुंखे उपस्थित होते.




