भुसावळात उद्या कोवॅक्सीनच्या दुसर्या लसींचे लसीकरण
भुसावळ : नगरपालिकेच्या यावल रस्त्यावरील मुख्य दवाखान्यात 45 वर्षावरील नागरीकांना कोवॅक्सीनचा दुसरा डोस शनिवारी दिला जाईल. लसीकरणासाठी 100 डोस उपलब्ध आहेत. शहरातील खडका रोड केंद्र, वरणगाव रोड केंद्र , बद्री प्लॉट दवाखाना, महात्मा फुले आरोग्य केंद्र येथे डोस नसल्याने लसीकरण मोहिम बंद राहणार असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.




