पसार महिला आरोपी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात


भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम कलमान्वये 15 फेबु्रवारी गुन्हा दाखल असून या गुन्ह्यातील पसार महिला आरोपीस यावल तालुक्यातील अंजाळा शिवारातील जागृत हनुमान मंदिरजवळून शुक्रवारी अटक करण्यात आली. निर्मलाबाई उर्फ भुरी मॉ प्रशांत जाधव (54, रा.इंद्रानगर, जामनेर रोड, भुसावळ) असे अटकेतील महिलेचे नाव आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक किशोर महाजन, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, दिनेश कापडणे व महिला कॉन्स्टेबल प्रिया आरखराव, महिला होमगार्ड विद्या लोखंडे आदींच्या पथकाने आरोपीस अटक केली. तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक किशोर महाजन करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !