भुसावळातील संत गाडगे महाराज हिंदी हायस्कूलच्या लिपिकाची रेल्वेखाली आत्महत्या
जळगाव : भुसावळातील संत गाडगे महाराज हिंदी हायसकूलच्या लिपिक राहुल राजाराम निलम (35, सिद्धीविनायक पार्क) यांनी रेल्वेखाली झोकून आत्महत्या केल्याची घटना जळगावातील बजरंग बोगद्याजवळ शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. खिशातील कागदपत्रावरून मयताची ओळख पटली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. त्यांच्या पश्चात आई सावित्री, पत्नी, मुलगा, भाऊ राकेश व भावजई असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस अनिल नगराळे यांच्यासह इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेहाच्या अंगाची झडती घेतली असता त्याच्या खिशातून मोबाईल व कागदपत्रांसह दुचाकीची चावी आढळून आल्याने त्यावरुन मयताची ओळख पटली.




