वाढदिवस केला अविस्मरणीय : अनाठायी खर्चाला फाटा देत आरोग्य केंद्राला दिले वॉटर फिल्टर
वरणगाव आयुध निर्माणीतील दाम्पत्याचा स्तुत्य उपक्रम
वरणगाव : आयुध निर्माणीतील दाम्पत्याने आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाचा होणारा खर्च टाळत पिंपळगाव खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्राला गरम व थंड पाण्याचे मशीन तसेच एक हजार लिटरची पाण्याची टाकी भेट देवून वाढदिवस अविस्मरणीय केला.
यांची होती उपस्थिती
पिंपळगाव खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमास आयुध निर्माणीतील विवेक पाटील व सुवर्णा पाटील या दाम्पत्याला 28 मे 2020 रोजी पूत्र रत्न प्राप्त झाले होते. मुलगा हर्षीत याचा प्रथम वाढदिवसाला होणार्या खर्चाला फाटा देत प्राथमिक आरोग्य केंद्राला गरम व थंड पाण्याच्या यंत्रासह पाण्याची समस्या निकाली निघण्यासाठी एक हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकीदेखील भेट दिली. ही भेट वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.वाय.तडवी, डॉ.नितीन सोनवणे यांना सुपूर्द करण्यात आली. यावेळी मधुकर पाटील, आयुध निर्माणीतील जेडब्लूएम एम.डी.बर्हाटे, उषा नॅशनल चिल्ड्रन सायन्स रिसर्च सेंटरचे अध्यक्ष जीवन महाजन, सुनील वानखेडे आदी उपस्थित होते.



समाजाचं देणे लागतो या भावनेतून केली मदत
वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणावर खर्च होतो शिवाय हा आनंद क्षणीक असून कोरोनाच्या काळात कार्यक्रम घेणे म्हणजे अडचणींना सामोेरे जाणे होय परंतु प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिलेल्या वस्तुमुळे अनेकांची सुविधा होणार असून सदरची बाब ही चिरकाल टिकणारी आहे. यामुळे समाजाचे देणे लागतो या भावनेतून मदत केली व यामुळे काही प्रमाणात का होईना इतरांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत होईल, असे विवेक पाटील म्हणाले.

