तापी काठानंतर आता वादळाची वक्रदृष्टी पाल भागात राहत्या घरांसह शेतीचे नुकसान


रावेर : तालुक्यात सलग दुसर्‍या दिवशी वादळी पावसाचे थैमान सुरु आहे.तापी काठाच्या नुकसानीनंतर वादळाने आपला मोर्चा सातपुडा कुशीतील पाल, गुलाबवाडीसह आदिवासी गावांकडे वळविला आहे. गोरगरिबांची राहत्या घरासह परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. रावेर तालुक्यातील तापी काठालगत असलेल्या 23 गावांमध्ये वादळी पावसाने कोट्यावधी रुपयांचे नुकसान केले आहे. 29 रोजी पाल, गुलाबवाडी गावासह परिसरात सायंकाळच्या सुमारास अचानक चक्रीवादळासह जोरदार पाऊस सुरु झाला. त्यात ग्रामीण रुग्णालयात एक मोठे झाड उन्मळून पडले. सुदैवाने, त्यात कोणाचीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, तापी काठानंतर आता वादळाने पाल भागाकडे वक्रदृष्टी वळविली आहे.
सविस्तर असे, गावातील पत्रकार मनीष सुपडू बाविस्कर यांच्या राहत्या घरावरील पत्र्यांचे संपूर्ण छत उडून गेले. घरातील जीवनावश्यक सामानासह घरातील संगणक संचही खराब झाला. त्यामुळे हे कुटुंब उघड्यावर आले आहे. देवसिंग भिकुसिंग पारधी यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने त्यांची पत्नी सुनंदाबाई जखमी झाली. ग्रामीण रुग्णालयासमोरील अंजनाचे झाड उन्मळून पडले. सुदैवाने झाड विरुध्द दिशेने पडल्याने मोठा अनर्थ टळला. डॉक्टर, अधिपरिचारिका आणि सर्व कर्मचारी दवाखान्यातच होते. परिसरात अनेक ठिकाणी विद्युत तार तुटून पडल्याने लाईट बंद झाली आहे. तसेच मंजुळा धनराज धांडे आणि प्राजक्त धांडे यांची सहा एकरवरील केळी जमीनदोस्त झाली आहे.

गुलाबवाडी येथेही केळीसह घराचे नुकसान
रघुनाथ प्रल्हाद कोल्हे, एकनाथ रोहिदास पवार, चरत रोहिदास पवार, वसंत, श्रावण पवार, लक्ष्मण पवार यांचे केळी पिकांचे नुकसान तर प्रकाश राठोड, राजू चव्हाण, सुनील झमु पवार, लखीचंद राठोड, नवलसिंग, सुकलाल, दारासिंग, भुरा चव्हाण, मोहनसिंग पावरा, हंसराज पवार यांच्या घरावरील पत्रे उडून नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. विजय मानसिंग पवार, गणेश मानसिंग पवार, करणसिंग शंकर जाधव, राजू एकनाथ चौधरी, विकास खेमसिंग चव्हाण, भिमसिंग चतरु चव्हाण,, कामील नामदार तडवी आदींसह शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. मनीष बाविस्कर, विजय पारधी, मुक्कदर तडवी, लक्ष्मण गमा राठोड, कमरुद्दीन खान प्रकाश राठोड यांच्या राहत्या घरावरील पत्रे उडून नुकसान झाले आहे. जुम्मा अरमान तडवी यांच्या घरावर जीर्ण झाड पडून घराचे नुकसान तर अर्जुन रतनसिंग जाधव यांच्या घरासमोर उभा असलेला ट्रॅक्टरवर झाड पडल्याने
नुकसान झाले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !