दिवसा वाळू नदीपात्राबाहेर : कारवाई टाळण्यासाठी मध्यरात्री होतेय वाहतूक


भुसावळ प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी लक्ष घालण्याची अपेक्षा

मुक्ताईनगर : वाळू चोरी संदर्भात माध्यमांनी आवाज उठवताच प्रशासनाला जाग आल्यानंतर वाळू चोरट्यांविरोधात कारवाई होवू लागताच वाळू माफियादेखील अलर्ट झाले आहेत. मजुरांकरवी नदीपात्रातून वाळू बाहेर काढून नदीच्या काठावर थप्पी लावायची व प्रशासनाची कारवाई टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी अवजड वाहनांद्वारे वाळू वाहतूक करायची, असा प्रकार या परीसरात सुरू असल्याने भुसावळ प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे व जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

तलाठ्यांचा आता नदीपात्रात पहारा
कुर्‍हाकाकोडा परीसरातील कोर्‍हाळा, रीगाव, धुपेश्वर या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू माफियांनी वाळूची चोरी सर्रास चालवली होती मात्र माध्यमांमध्ये याबाबत वृत्त झळकताच प्रशासनाला जाग आली व वाळू वाहतूकदारांवर कारवाईस सुरूवात झाली व आता मुक्ताईनगर तहसीलदार श्वेता संचेती यांनी स्थानिक पोलीस पाटील व तलाठी यांच्या नदीपात्रात वाळू चोरी रोखण्यासाठी ड्युट्या लावल्याने वाळू माफियांनी दिवसा होणारी वाळू चोरी थांबवली मात्र मजुरांना कामाला लावत नदीपात्रातून वाळू बाहेर काढून तिचा नदीच्या काठावर साठा करायचा व मध्यरात्री वाळू वाहतूक करायचा असा प्रकार सुरू असल्याने प्रशासनाने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !