केळी पीक विम्यातील निकष बदलाचा संताप : मुक्ताईनगरात फडणवीसांचा ताफा अडवला


मुक्ताईनगर : जिल्ह्यातील प्रमुख शेती उत्पादन असलेल्या केळी पीक विम्याचे निकष केंद्र सरकारने बदलल्यामुळे शेतकर्‍यांना होत असलेल्या नुकसानीमुळे संतप्त शेतकर्‍यांसह शिवसैनिकांनी जिल्हा दौर्‍यावर आलेल्या विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा मुक्ताईनगरातील प्रवर्तन चौकात आल्यानंतर अडवताच यंत्रणेची धावपळ उडाली. प्रसंगी मोजक्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून देवेंद्र फडणवीसांनी निवेदन स्वीकारल्यानंतर पोलिसांनी पुढचा मार्ग मोकळा केला. पोलिसांनी मोजक्याच लोकांना फडणवीस यांच्याशी चर्चेची परवानगी दिली होती.

हे देखील वाचा : पंचनाम्यांची गरज नाही : राज्याने सरसकट भरपाई द्यावी -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस



शेतकर्‍यांसह शिवसैनिकांचा सहभाग
शेतमाल हमीभाव , खतांच्या आणि बियाण्यांच्या किमती, केळी उत्पादक शेतकर्‍यांना अपेक्षित असलेल्या अन्य सुविधांसाठीही हे शेतकरी आग्रही होते. मुक्ताईनगर, जळगाव, येथील राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर राजकारण रंगलेले असताना शिवसैनिकही या शेतकर्‍यांच्या सोबत सहभागी झाल्याने स्थानिक राजकीय संदर्भांनीसुद्धा या आंदोलनाची चर्चा रंगली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !