फडणवीस म्हणाले ; नाकर्तेपणा लपवण्यासाठी राज्याचे केंद्राकडे बोट


रावेर : केळी पट्ट्यातील वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस झाल्याने शेकडो हेक्टरवरील केळी आडवी झाल्यानंतर नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंगळवारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस जिल्हा दौर्‍यावर आले होते. मुक्ताईनगरसह रावेर तालुक्यातील केळी बांधावर थेट फडवणीस यांनी जावून शेतकर्‍यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणल्या. राज्य शासनाने पंचनाम्यांऐवजी थेट शेतकर्‍यांना भरपाई द्यावी, असे त्यांनी सांगत आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी राज्य शासन केंद्राकडे बोट दाखवत असल्याचे ते म्हणाले.

यांचा होता दौर्‍यात समावेश
माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील पाहणी दौर्‍यात माजी मंत्री गिरीष महाजन, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेश पाटील, आमदार चंदूलाल पटेल, भुसावळचे आमदार संजय सावकारे, मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, बेटी पढाओचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर आदींसह भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.



रावेर तालुक्यातही केली पाहणी
फडणवीस यांनी रावेर तालुक्यातील विटवा, ऐनपूर, कळमोदा, धामोडी, वाघाडी, खिर्डी, तांदलवाडी परीसरात पाहणी करीत शेतकर्‍यांच्या समस्या जाणल्या.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !