मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांनी केले ईगतपुरी-भुसावळ सेक्शनचे सेफ्टी निरीक्षण
भुसावळ : मध्य रेल्वे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी मंगळवारी भुसावळ विभागातील इगतपुरी भुसावल सेक्शनचे सेफ्टी निरीक्षण केले. यावेळी डीआरएम विवेककुमार गुप्ता व शाखा अधिकारी उपस्थित होते.
तिसर्या व चौथ्या रेल्वे लाईनचा घेतला आढावा
कंसल यांनी इगतपुरी-भुसावळ सेक्शनमध्ये सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी निरीक्षण यानद्वारे केली. तिसरी आणि चौथी लाईन च्या कामांचा आढावा घेतला. त्यांनी प्रवासी सुविधांशी संबंधित कामांचा आढावा सुद्धा घेतला. त्यांनी यंत्रणेतील सुधारणेच्या मुळ कारणांचे विश्लेषण करण्याचे निर्देश अधिका-यांना दिले.त्यांनी विभागीय अधिका-यांना नियमितपणे पाणीपुरवठ्याची गुणवत्ता तपासण्यासाठी सांगितले.



भुसावळात केली पाहणी
कंसल यांनी निरीक्षणानंतर भुसावळ स्थानकांची स्वच्छता, दक्षिण दिशा परीसर, बुकिंग ऑफिस, आरक्षण केंद्र, गार्डनचे निरीक्षण केले. प्लॅटफार्म क्रमांक तीन येथे प्रतीक्षालय , वातानुकूलित प्रतीक्षालय , गार्ड आणि लोकोपायलट लॉबचे निरीक्षण करण्यात आले. मंडळ रेल प्रबंधक कार्यालयात शाखा अधिकारी आणि मान्यताप्राप्त संघटना पदाधिकारी सोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

