अहिल्ल्याबाई होळकरांनीं बांधलेले तीर्थक्षेत्र नागेश्वर जिल्ह्यात अव्वल होणार : सहकार मित्र चंद्रकांत बढे
वरणगाव : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या हस्ते स्थापन झालेल्या तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिरावर पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांची 296 वी जयंतीची प्रथम सुरूवात भारतीय जनता पार्टीच्या वतीने दरवर्षी आता जयंती नागेश्वर येथेच होईल व तीर्थक्षेत्र नागेश्वर जिल्ह्यात अव्वल होणार, असा आशावाद सहकार मित्र चंद्रकांत बढे यांनी व्यक्त केले. प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, ज्येष्ठ नेते दत्तूपंत मराठे, कामगार नेते मिलिंद मेढे, जिल्हा उपाध्यक्ष अॅड.ए.जी.जंजाळेख नामदेव, पहेलवान, धनगर समाज अध्यक्ष शामराव धनगर, गजानन वंजारी, माजी सरपंच सुभाष धनगर, प्रणिता पाटील-चौधरी, कृष्णा माळी, संदीप माळी, डॉ.प्रवीण चांदणे, मिलिंद भैसे, विकास बोरसे, रॉकभाऊ कश्यप, राहुल जंजाळे, रमेश पालवे, सुखदेव धनगर, बाळा धनगर, प्रकाश भानुदास चौधरी, आकाश निमकर, पप्पू ठाकरे राम भोई, संकेत धनगर यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

