भुसावळ विभागातील 86 कर्मचारी सेवानिवृत्त


भुसावळ : रेल्वेच्या प्रदीर्घ सेवेनंतर भुसावळ रेल्वे विभागातून सोमवार, 31
मे रोजी 86 रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत कर्मच्यांना रेल्वेतर्फे तत्काळ 24 कोटी रुपये ऑनलाईन त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले. सेवानिवृत्ती संदर्भात रेल्वेद्वारा वर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा यथोचीत सन्मान
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे समारंभाचे आयोजन न करता सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा यथोचित सन्मान वर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाद्वारे तसेच त्यांच्या सेवेच्या कार्यालयात रेल्वे प्रतिनिधि म्हणून बर्‍हाणपूर, खंडवा, चाळीसगाव, भुसावळ, बडनेरा, मनमाड, अकोला आदी ठिकाणी कल्याण निरीक्षकांनी जाऊन पी.पी.ओ फोंल्डर दिलेत. डीआरएम कार्यालयात सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना सहा. कार्मिक अधिकारी बी.एस.रामटेके यांच्या हस्ते पी.पी.ओ. फोल्डर देण्यात आले. सूत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी विरेंद्र वडनेरे यांनी केले. सेवानिवृत्तीबद्दल कर्मचार्‍यांना विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोजकुमार सिन्हा, वरीष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांनी सेवानिवृत्तीबद्दल मार्गदर्शक करीत शुभेच्छा दिल्या. आभार मंडळ कार्मिक अधिकारी दिलीप खरात यांनी मानले. यशस्वीतेसाठी सेटलमेंट आणि लेखा विभागातील कर्मचारी तसेच सर्व कल्याण निरीक्षक आदींनी परीश्रम घेतले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !