चुंचाळेतील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांच्यावर अविश्वास


यावल : तालुक्यातील चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा पाटील यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. सोमवारी यावल तहसीलदारांकडे एकूण दहा सदस्यांपैकी ग्रामपंचायतीतील उपसरपंचसहित आठ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला.

विशेष सभेकडे लागले लक्ष
चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील या तीन वर्षापूर्वी डिसेंबर 2017 मध्ये सरपंच पदावर विराजमान झाल्या होत्या. गेल्या काही महिन्यापासून सरपंच पाटील या उपसरपंच व सदस्यांना विश्वासात घेऊन कामकाज करत नसल्याने सोमवारी येथील तहसील कार्यालयात उपसरपंच नाजिमा अन्वर तडवींसह सदस्यांनी सरपंच सुनंदा पाटील यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव तहसीलदार महेश पवार यांच्याकडे सादर केला. या अविश्वास प्रस्तावावर सुकलाल यशवंत पाटील, अनिल पंडीत कोळी, अरमान मनवर तडवी, दगडू किताब तडवी, शारदा सुधाकर चौधरी, नवशाद सायबु तडवी, जयनूर संजय तडवी, सिंधुबाई संजय पाटील आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. दरम्यान, या अविश्वास ठरावावर आता तहसीलदार कधी विशेष सभा बोलवतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !