करंजीत पहिल्या पावसात उडाली जि.प.शाळेची पत्रे


शाळेची दयनीय अवस्था ; तत्काळ दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी

यावल : तालुक्यात 30 मे रोजी झालेल्या वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे करंजी येथील जि.प.शाळेतील पन्हाळी पत्रे उडाल्याने शाळेची दयनीय अवस्था झाली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

तत्काळ दुरुस्तीची अपेक्षा
रविवार, 30 मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस झाला. यात सोसाट्याचा वारा सुटल्याने करंजी जि.प. प्राथमिक शाळेतील छतावरील पन्हाळी पत्रे हवेत उडाली त्यामुळे शाळेतील वर्ग खोल्या उघड्यावर पडून आहेत. सरपंच सिंधुबाई सोनवणे, शाळेतील मुख्याध्यापक भाग्यश्री बारेला, शीतल पाटील, नंदकिशोर सोनवणे, मुकेश सोनवणे, सचिन झाल्टे, कुमार झाल्टे, लक्ष्मीकांत झाल्टे, संदीप सोनवणे, परशुराम पाटील, राधेश्याम पाटील यांनी शाळेला भेट देऊन पंचनामा करण्यात केला. आता शाळेची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !