उन्हाळी विशेष ट्रेनच्या सेवांचा विस्तार
भुसावळ : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने सुधारित संरचना व विशेष शुल्कासह पुढील उन्हाळी विशेष गाड्यांची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 09011 उधना-दानापुर एक्स्प्रेस 31 मे पर्यंत (एक फेरी) आणि 09012 दानापुर-उधना 2 जून पर्यंत (एक फेरी) वाढविण्यात आली आहे. 09087 उधना-छपरा 4 जून पर्यंत (एक फेरी), 09088 छपरा-उधना 6 जून पर्यंत (एक फेरी) वाढविण्यात आली आहे. सर्व विशेष गाड्या आपल्या नियोजित वेळेनुसार चालविण्यात येतील, असे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.




