वाघोडला विवाहितेची आत्महत्या


रावेर : तालुक्यातील वाघोड येथील २३ वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. याबाबत रावेर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हर्षाली अतुल चौधरी (२३) असे मयत विवाहितेचे नाव आहे. विवाहिता घरात एकटीच असतांना तिने छताच्या पंख्याला मोठा रूमाल बांधून गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत नितीन नत्थू चौधरी यांनी दिलेल्या खबरीनुसार रावेर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. तपास पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मनोहर जाधव, सोनवणे तपास करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !