शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी हर्षल माने यांची निवड
गुलाबराव वाघ सहसंपर्क प्रमुख तर जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी माजी महापौर विष्णू भंगाळे यांची जिल्हाप्रमुखपदी निवड
जळगाव : शिवसेनेने जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी माजी महापौर विष्णू भंगाळे व जिल्हा परीषद सदस्य डॉ.हर्षल माने यांची जिल्हाप्रमुखपदी निवड केली आहे. भंगाळे यांच्याकडे जळगाव शहर, जळगाव ग्रामीण व अमळनेर विधानसभा मतदारसंघ, तर डॉ.माने यांच्याकडे एरंडोल, पाचोरा आणि चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांना वरीष्ठ पातळीवर संधी देऊन सहसंपर्कप्रमुखपदी निवड करण्यात आली.




