नॉन-इंटरलॉकिंग कामांमुळे रेल्वेगाड्या रद्द


भुसावळ : उत्तर रेल्वेच्या अंबाला विभागात पूर्वीय डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉरच्या कामासंदर्भात रेल्वेने सरहिंद स्टेशनच्या नॉन इंटरलॉकिंगचे काम हाती घेतले आहे. यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात गाडी क्रमांक 01078 जम्मू तवी-पुणे विशेष गाडी 26, 27, 28 व 29 जूनला (4 फेर्‍या) रोजी सुटणारी आणि 01077 पुणे-जम्मू तवी विशेष दि. 25, 26, 27 व 28 जूनला (4 फे-या) रोजी सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. तर 01078 जम्मू तवी – पुणे दि. 25 रोजी सुटणारी विशेष ट्रेन प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे सरहिंद स्टेशनवर थांबणार नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !