जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 158 रुग्ण आढळले : चौघांचा मृत्यू


एकाच दिवसात 629 रुग्णांनी केली मात ; आज सर्वाधिक रुग्ण चाळीसगाव तालुक्यात

जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येसह मृत्यूदरात घट होत असून 24 तासात नव्याने 158 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात चार रुग्णांचा मूत्यू झाला. गत 24 तासात 629 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत दोन हजार 548 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

24 तासात चार रुग्णांचा मृत्यू
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात चार रुग्णांचा मृत्यू ओढवला तर 24 तासात 629 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 40 हजार 604 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 34 हजार 227 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.



शुक्रवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 18
जळगाव ग्रामीण 03
भुसावळ 07
अमळनेर 01
चोपडा 02
पाचोरा 04
भडगाव 07
धरणगाव 00
यावल 04
एरंडोल 20
जामनेर 06
रावेर 20
पारोळा 02
चाळीसगाव 45
मुक्ताईनगर 04
बोदवड 13
अन्य जिल्हा 02



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !