जळगाव जिल्हा सोमवारपासून होणार ‘अनलॉक’


राज्यात पाच टप्प्यात सोमवारपासून होणार ‘अनलॉक’

मुंबई : राज्यात कोरोना रुग्ण संख्येत घट होत असल्याने अनलॉकच्या प्रक्रियेला सुरूवात होत आहे. राज्यात पाच टप्प्यात अनलॉक केलं जाणार असून यामुळे नागरीक आणि व्यापार्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या 7 जूनपासून म्हणजे सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. मुख्यमंत्री कार्यालयाने मध्यरात्री याबाबत नोटीफिकेशन जारी केले आहे.

पाच टप्प्यांचे असे आहेत निकष-



पहिल्या टप्प्यात- 5 टक्के पॉझीटीव्हीटी रेट आणि 25 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेडस् व्यापलेले असावेत

दुसर्‍या टप्प्यात – 5 टक्के पॉझीटीव्हीटी रेट आणि 25 ते 40 टक्क्यांमध्ये ऑक्सिजन बेड्स व्यापलेले असावेत

तिसर्‍या टप्प्यात – 5 ते 10 टक्क्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट आणि 40 टक्क्यापेक्षा जास्त ऑक्सिजन बेड्स व्यापलेले असावेत

चौथ्या टप्प्यात- 10 ते 20 टक्क्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट आणि 60 टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड्स व्यापलेले

पाचव्या टप्प्यात- 20 टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हीटी रेट आणि 75 टक्क्यापेक्षा जास्त ऑक्सिजन बेड्स व्यापलेले

या टप्पेनिहाय आपला जिल्हा होणार ‘अनलॉक’

पहिला टप्पा- अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, यवतमाळ

दुसरा टप्पा- नंदूरबार, हिंगोली,

तिसरा टप्पा- अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, गडचिरोली, मुंबई, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम

चौथ्या टप्पा- बुलढाणा, कोल्हापूर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग

पाचवा टप्पा- एकाही जिल्ह्याचा समावेश नाही, परंतु पॉझिटिव्हीटी रेट 20 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर तुमचा जिल्हा रेड झोनमध्ये येऊ शकतो.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !