भुसावळात स्व.अरुण मांडळकरांच्या निधनानिमित्त उद्या श्रद्धांजली सभा


भुसावळ : जय गणेश फाऊंडेशनचे समन्वयक, महाराणा प्रताप विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तसेच रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अरुण शांताराम मांडळकर यांचे नुकतेच निमोनिया आजाराने निधन झाले. भुसावळ शहराच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक जडण-घडणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला असून रविवार, 6 जून रोजी संध्याकाळी पाच वाजता सुरभी नगरातील नवसाचा गणपती मंदिर परीसरात कोरोना नियमांचे पालन करून मर्यादित मान्यवरांच्या उपस्थितीत जय गणेश फाऊंडेशन च्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सामाजिक, सांस्कृतिक, नाट्य व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर त्यांना श्रद्धांजली अर्पण करतील.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !