भुसावळात पर्यावरण दिनानिमित्त कापडी पिशव्यांचे वाटप
भुसावळ : पर्यावरण दिनानिमित्त शहरातील जामनेर रोडवरील भाजी मार्केट जवळ, प्लॅस्टिक कॅरीबॅग विरोधी अभियान राबवण्यात आले. प्लास्टिक कॅरीबॅग पर्यावरण आणि कोरोना असा संबंध जोडत, शैला सावंत यांनी लोकांशी संवाद साधला. प्रसंगी कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. शहरातील नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. परीसरातील दुकानांना भेटी देऊन सदर अभियानास सहकार्य करण्याचे ठाकूर यांनी दुकानदारांना आवाहन केले. राष्ट्र सेवा दलाचे युवराज कुरकुरे, श्रीफाऊडेशनचे किरण मिस्तरी, चंद्रकांत चौधरी, विजय निंबाळकर, निलेश फालक. बेहरा इत्यादींचा अभियानात सहभाग होता.




