पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळात गरजूंना मदतीसह पालिका दवाखान्यात औषधांचे वाटप


भुसावळ : जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या 55 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी शहरातील गरजू नागरीकांना अन्नदानाचे वाटप करण्यात आले तसेच नगरपालिका रुग्णालयाला औषधांचा पुरवठा करण्यात आला तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या परीवाराला आर्थिक मदतीचा हात देण्यात आला.

सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा
लाडके पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शनिवारी वाढदिवस असल्याने शिवसेना पदाधिकार्‍यांनी विविध उपक्रम राबवले. त्यात आर्थिक परीस्थिती बेताची असलेल्या महिलेला आर्थिक मदत देण्यात आली व गरीब दिव्यांग महिलांना आर्थिक मदत देण्यात आली तसेच 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस असल्यामुळे वृक्षारोपण करण्यात आले तसेच पोलिस कर्मचारी व होमगार्ड यांना सॅनिटायझर व मास्क देण्यात आले तसेच बाजारात भाजीपाला विक्रेत्यांनाही मास्क देण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख उत्तम सुरवाडे, शहरप्रमुख निलेश महाजन, शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ, कट्टर शिवसैनिक नमा शर्मा, हेमंत बर्‍हाटे, मिलिंद कापडे, धीरज वाढोणकर, मनोज ठाकूर इत्यादी उपस्थित होते. दरम्यान कट्टर शिवसैनिक नमा शर्मा यांच्या वतीनेेेे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, कार्यक्रमाचे आयोजन शिवसैनिक व शिवभोजन केंद्र संचालक उमाकांत शर्मा (नमा) भुसावळ यांनी केले होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !