भुसावळात पालकमंत्र्यांच्या वाढदिवशी आरोग्य कर्मचार्यांचा सन्मान
भुसावळ : कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या संकटात जीवावर उदार होऊन प्रामाणिकपणे रुग्णसेवा करणार्या तसेच केंद्र व राज्य शासनाच्या कोविड 19 लसीकरण अभियानात उत्कृष्ट कार्य करणार्या आरोग्य कर्मचार्यांना शिवसेना उपनेते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौरवण्यात आले. भुसावळ शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांच्या वतीने महात्मा फुले आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, अधिपरीचारीका, आरोग्य सेवक, आशा कर्मचार्यांना ‘कोरोना योद्धा’ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
शिवसेना कार्यालयीन उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, शहरप्रमुख निलेश महाजन, शहरप्रमुख बबलू बर्हाटे, माजी नगरसेवक दीपक धांडे, माजी नगरसेवक नरेंद्र लोखंडे, रेल कामगार सेना मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा, सचिव विनोद वाघे, विभागप्रमुख अमोल पाटील, रीतेश सोनवणे उपस्थित होते. आरोग्य कर्मचार्यांना शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, रेल कामगार सेना पदाधिकार्यांनी कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करीत सन्मानीत केले.

कार्याचा गौरव करणे शिवसैनिकांचे आद्य कर्तव्य : प्रा.धीरज पाटील
कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या संकटात गेल्या दीड वर्षापासून डॉक्टर, परीचारीका, आरोग्यसेवक आशा कर्मचारी कोरोना रुग्णांच्या संपर्कात राहून अविरत रुग्णसेवा करीत आहेत. यात काही कर्मचार्यांना या आजाराचा संसर्गदेखील झाला होता. त्यावर मात करून हे कर्मचारी पुन्हा रुग्णसेवेत उपस्थित झाले आणि आता केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेल्या कोविड लसीकरण अभियानात योगदान देत आहेत. या सर्व कर्मचार्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा गौरव करणे शिवसैनिकांचे आद्य कर्तव्य आहे, असे आयोजक शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील म्हणाले.

