पनवेल आणि गोरखपूर-छपरा दरम्यान पूर्णतः आरक्षित विशेष गाड्या धावणार
भुसावळ : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने पनवेल – गोरखपूर व पनवेल – छपरा दरम्यान विशेष शुल्कासह पूर्णतः आरक्षित ग्रीष्मकालीन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
या गाड्या धावणार
पनवेल-गोरखपूर-पनवेल विशेष (14 फेरी) गाडी 05064 विशेष पनवेल येथून दि. 7, 11, 14, 18, 21, 25 आणि 28 जूनला (7 फेर्या) रोजी दुपारी 2.20 वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसर्या दिवशी रात्री 7.20 वाजता पोहोचेल. 05063 विशेष गोरखपूर येथून दि. 6, 10, 13, 17, 20, 24 आणि 27 जूनला (7 फेर्या) रोजी 8 वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसर्या दिवशी 12.40 वाजता पोहोचेल. ही गाडी मार्गात कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, झांसी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती, खलीलाबाद येथे थांबेल.



पनवेल-छपरा-पनवेल अतिजलद विशेष गाडी
05194 विशेष पनवेल येथून दि. 13, 20 आणि 27 जूनला (3 फेर्या) रात्री 11.40 वाजता सुटेल आणि छपरा येथे तिसर्या दिवशी पहाटे 5.30 वाजता पोहोचेल. 05193 विशेष छपरा येथून दि.12, 19 आणि 26 जूनला (3 फेर्या) दुपारी 3.35 वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसर्या दिवशी रात्री 10.50 पोहोचेल. ही गाडी कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज जंक्शन, वाराणसी, गाजीपूर शहर, बलिया येथे थांबेल.

