चक्कर येवून पडल्याने शेतकर्याचा मृत्यू
यावल : चक्कर येवून पडल्याने तरुण शेतकर्याचा मृत्यू झाला. तालुक्यातील अंजाळे गाव शिवारातील तापी नदीच्या काठावर ही घटना शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. विकास भागवत सपकाळे (40, अंजाळे, ता.यावल) असे मयत शेतकर्याचे नाव आहे. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट
विकास भागवत सपकाळे हा तरुण शेतकरी शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अंजाळे शिवारातील तापी नदीच्या काठावर असलेल्या मारोती मंदीराकडे गेला असता त्या ठिकाणी अचानक त्यास चक्कर येवून पडल्याने त्यास बेशुद्ध अवस्थेत प्रथम उपचारासाठी भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले व नंतर यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी मृत घोषीत केले. या संदर्भात मयताचे वडील भागवत नामदेव सपकाळे यांनी दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक प्रल्हाद जवरे हे करीत आहे.



